|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » विश्वचषक स्पर्धेसाठी इराण पात्र

विश्वचषक स्पर्धेसाठी इराण पात्र 

वृत्तसंस्था/ तेहरान

2018 साली रशियात होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इराण फुटबॉल संघाने आपले तिकिट आरक्षित केले आहे. सोमवारी येथे झालेल्या अ गटातील पात्र फेरीच्या सामन्यात इराणने उझ्बेकस्तानचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच इराण संघाने आगामी फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला.

सोमवारच्या सामन्यात इराणतर्फे सरदार अझमौन आणि मेहदी तारेमी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. अ गटात इराणचा हा आठ सामन्यातील सहावा विजय आहे. इराणने या गटात 20 गुणांसह पहिले स्थान राखले असून दक्षिण कोरियाचा संघ 13 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.

इराणच्या फुटबॉल संघाने आतापर्यंत चारवेळा फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. 1978, 1998, 2006, 2014 साली इराणच्या फुटबॉल संघाने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. आता 2018 ची फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा रशियात 14 जून ते 15 जुलै दरम्यान खेळविली जाईल.

Related posts: