|Saturday, December 14, 2019
You are here: Home » leadingnews » आता शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज ; केंद्र सरकारची मान्यता

आता शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज ; केंद्र सरकारची मान्यता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शेतकऱयांना देण्यात येणाऱया पीककर्जावर सध्या 9 टक्के व्याज आकारले जाते. यापैकी 5 टक्के व्याज सरकार भरणार असल्याने शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज देण्यात येणार आहे, याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

शेतकऱयांना 9 टक्के व्याजदराने पीककर्ज देण्यात येत आहे. हा व्याजदर कमी करत 5 टक्के व्याज सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज दिले जाणार आहे. तसेच फक्त 3 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱयांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी यांसारख्या विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱयांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Related posts: