|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या घोषणेपूर्वी दबाव

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या घोषणेपूर्वी दबाव 

बीएसईचा सेन्सेक्स 52, एनएसईचा निफ्टी 11 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरासंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याने बाजारात काही प्रमाणात दबाव होता. मात्र खालच्या पातळीवरून चांगली रिकव्हरी दिसून आली. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 31,055 आणि निफ्टी 9,580 पर्यंत घसरला होता. मात्र दिवसअखेरीस दोन्ही प्रमुख निर्देशांकात तेजी येत बंद झाले.

बीएसईचा सेन्सेक्स 52 अंशाने वधारत 31,156 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 11 अंशाने वधारत 9,618 वर बंद झाला.

मिडकॅप समभागात खालच्या पातळीवरून काही प्रमाणात खरेदी झाली. स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक वधारत 14,800 च्या वर बंद झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान हा 14,701 पर्यंत घसरला होता. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारत बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

एफएमसीजी, धातू, औषध आणि ऊर्जा समभागात विक्री दिसून आली. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 0.75 टक्के, धातू निर्देशांक 0.7 टक्के आणि औषध निर्देशांक 0.2 टक्क्यांनी कमजोर झाला.

पीएसयू बँक, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू आणि तेल आणि वायू समभागात खरेदी दिसून आली. बँक निफ्टी 0.1 टक्क्यांनी वधारत 23,500 च्या आसपास बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 1.5 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 0.9 टक्के आणि तेल आणि वायू निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

रिलायन्स इन्डस्ट्रीज, बँक ऑफ बडोदा, डॉ. रेड्डीज लॅब, एल ऍण्ड टी, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनि 3.3-1.25 टक्क्यांनी वधारत बंद झाले. येस बँक, सिप्ला, आयटीसी, टाटा स्टील, विप्रो आणि एचडीएफसी 3-1.1 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

मिडकॅप समभागात अलाहाबाद, बँक, आयडीबीआय बँक, गोदरेज इन्डस्ट्रीज, एल ऍण्ड टी फायनान्स आणि युनियन बँक 7.7-2.4 टक्क्यांनी मजबूत झाले. मिडकॅप समभागात व्हिडिओकॉन, कॅडिला हेल्थ, एम्फेसिस, आणि जीई टी ऍण्ड डी इंडिया 4.8-1.9 टक्क्यांनी घसरत बंद झाले.

स्मॉलकॅप समभागात ऑरिनप्रो सोल्युशन्स, लवेबल लॉन्जरे, जियोजित फानयान्शियल, युको बँक आणि मोन्टे कार्लो 19.4-10.25 टक्क्यांनी वधारत बंद झाले. स्मॉलकॅप समभागात भूषण स्टील, फ्लेक्सिटफ इन्टरनॅशनल, जायकॉम, विपुल आणि शिल्पी केबल 6.6-5 टक्क्यांनी घसरले.

Related posts: