|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नियमित कर्ज भरणाऱयांना प्रोत्साहनपर अनुदान द्या!

नियमित कर्ज भरणाऱयांना प्रोत्साहनपर अनुदान द्या! 

सिंधुदुर्गनगरी :

   जिल्हा बँकेमार्फत दरवर्षी 100 कोटी रुपयांच्यावर कर्ज शेतकऱयांना दिले जाते आणि नियमित भरले जाते. त्यामुळे कर्जाची परतफेड करणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. तसेच शेती व शेतीपूरक कारणासाठी दिलेल्या सर्व कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेमध्ये करण्यात यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन शासनाकडे केली आहे. पीककर्जाबाबत विविध प्रश्नावरही त्यांनी चर्चा केली.

  जिल्हा बँक अध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी संचालक प्रकाश मोर्ये, अविनाश माणगांवकर, प्रकाश गवस, प्रकाश परब, निता राणे, प्रज्ञा परब, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, प्रमोद धुरी, आर. टी. मर्गज आदी संचालक उपस्थित होते. या भेटीच्यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली व चर्चा केली.