|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अवनितर्फे सानेगुरूजींचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी

अवनितर्फे सानेगुरूजींचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

अवनि संस्थेच्या बालगृहात सानेगुरूजी यांचा स्मृतीदिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी सानेगुरूजींच्या साहित्यिक कार्याविषयी माहिती दिली.

प्रारंभी अवनि संस्थेतील मुलांनी सानेगुरूजींचे ‘खरा तो एकचि धर्म’ हे गीत सादर केले. त्यानंतर सुरज बुचडे याने सानेगुरूजींच्या विषयी माहिती सांगितली. बालगृहातील अधीक्षिका सुनिता भोसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन पुष्पा शिंदे यांनी केले.

 

 

Related posts: