|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ट्रक-दुचाकी अपघातात फोंडय़ात विद्यार्थीनीचा मृत्यू

ट्रक-दुचाकी अपघातात फोंडय़ात विद्यार्थीनीचा मृत्यू 

प्रतिनिधी /फोंडा :

फोंडा येथील कदंब बसस्थानकाजवळ दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. मुक्ता नवीन पटेल (रा. ढवळी-फोंडा) असे  तिचे नाव असून तिची काकी या अपघातात जखमी झाली आहे. काल गुरुवारी दुपारी 12.50 वा. साफा मशिदीजवळ हा अपघात झाला. मयत मुक्ता पटेल ही फेडा येथील आल्मेदा हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती.

फोंडा पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मुक्ता व तिची काकी जीए 05 ई 3173 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन फर्मागुडीहून फोंडय़ाकडे येत हेते. तिची काकी दुचाकी चालवती होती तर मुक्ता मागे बसली होती. यावेळी त्यांच्या मागून येणाऱया जीए 01 टी 0294 या क्रमांकाच्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला निसटती धडक लागली. दोघीही दुचाकीसह खाली कोसळल्या. मुक्ताच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने इस्पितळात नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. सदर ट्रक  रियल मद्य आस्थापनाचा असून अपघातानंतर घटनास्थळावरुन पळून जाणाऱया ट्रक चालकाला काही अंतरावर पकडण्यात आले.

फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीला पाठविला आहे. अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालक अमिनसाब सय्यद याला अटक करण्यात आली आहे. मयत मुक्ता पटेल हिच्या वडिलांचा ढवळी-फोंडा येथे व्यावसाय आहे.

Related posts: