|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » अमित शाह मुंबईत दाखल

अमित शाह मुंबईत दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबई विमानतळावर अमित शाह यांचे जोरदार स्वागात करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राज पुरोहित  हजर होते.

अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱयावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या 3 दिवसांच्या दौऱयासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, अमित शाह विमानतळहून दादरच्या चैत्यभूमीला रवाना झाले. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिल्यानंतर, शिवाजी पार्कवरील वीर सावरकरांच्या पुतळय़ाला अमित शहांनी अभिवादन केले आहे.

 

Related posts: