|Saturday, December 14, 2019
You are here: Home » leadingnews » 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला ; अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी

1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला ; अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईत 1193 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम, मुस्तफा डोसा याच्यासह अन्य पाच जणांना टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मुस्तफा डोसावर हत्या आणि कटाचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

संपूर्ण मुंबई शहराला हादरवून सोडणाऱया 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने फिरोझ खान, अब्दुल राशिद खान, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान या सर्वांना दोषी ठरवले आहे. 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांचा बळी गेला होता. तर 713 लोक जखमी झाले होते. या शक्तिशाली बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. पोर्तुगालवरुन प्रत्यार्पण करुन आणलेल्या अबू सालेमसह सात जणांबाबत टाडा न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Related posts: