|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » स्वामीनाथन यांना राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर करा : संजय राऊत

स्वामीनाथन यांना राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर करा : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर भारतीय जनता पक्षाला शिक्कामोर्तब करायचे नसल्यास डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रविवारी भेट होणार आहे. पण त्यापूर्वी शिवसेनेकडून राष्ट्रपतिपदासाठी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे नाव सुचवण्यात आले आहे. राऊत म्हणाले, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून शिवसेनेची मोहन भागवत यांना पहिली पसंती आहे. मात्र, भाजपला मोहन भागवत यांच्या नावाला विरोध असेल तर हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार घोषित करावे, अशी आमची मागणी आहे.