|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मनपाच्या बैठकीत गाडय़ांच्या विषयावर चर्चा

मनपाच्या बैठकीत गाडय़ांच्या विषयावर चर्चा 

92 गाडय़ांच्या परवान्यांचा प्रस्ताव मंजूर

प्रतिनिधी/ पणजी

 पणजी महानगर पालीकेच्या कालच्या बैठकीत पणजीत गाजत असलेल्या हातगाडय़ांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी या गाडय़ाविषयी मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर व महापौर सुरेंद फुर्तादो यांना धारेवर धरले. तसेच यावेळी पणजीत एलपीजी गॅस खोदकामाच्या निवेदनाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच मनपाच्या नविन ईमारतीचा आराखडय़ाविषयी चर्चा करण्यात आली. कालच्या बैठकीत एकूण 13 वेगवेगळय़ा विषयावर चर्चा करण्यात आली.

92 गाडय़ांच्या परवान्याचा प्रस्ताव मंजूर

 पणजी शहरात सध्या बेकायदेशीर हातगाडे हटवावे असा आदेश कोर्टच्या आदेशानुसार मनपाने काढला होता. यासाठी मनपाने समितीही स्थापन केली. पणजीत सध्या एकूण 120 गाडे असून यातील 92 गाडे फक्त कायदेशीर आहे. उरलेले 28 गाडे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे फक्त 92 गाडय़ांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रथम या गाडय़ांसाठी जागा ठरवा नंतर प्रस्ताव मंजूर करा अशी मागणी केली. यावेळेस समितीचे अध्यक्षांनी आपण या गाडय़ांसाठी जागा दाखविणार असे सांगितल्यांनतर एक मताने 92 हातगाडे मंजूर करण्यात आले.

 यावेळी महापौरांनी या 92 गाडेधारकांना परवाना दिला जाणार पण यासाठी त्यांना आपल्या गाडय़ावर कायदेशिररित्या मालकाचा फोटो, कुठला पदार्थ विकतात त्या पदार्थाचे नाव तसेच वेळ हे लिहावे लागणार आहे. कुठलाच गैरकारभार केला तर त्यांच्या गाडय़ांचा परवाना रद्द केला जाणार असा आदेश दिला जाणार. त्याचप्रमाणे फक्त फळे, रसआम्लेट, वडापाव. भेलपूरी, थंडपेय, आयस्क्रीम, भाजीपाव या गाडय़ांना परवानगी द्यावी. या व्यातरिक्त ऊसाचारस, मका, शहाळे विकणारे आढळले तर  त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाणार, असा आदेशही यावेळी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिला.

 यावेळी पणजी शहरात एलपीजीच्या गॅसपाईपलाईनसाठी रस्ते खोदण्याचे निवेदन मनपाकडे आले होते. याला विरोधकांनी विरोध केला प्रथम शहराचा आरखडा तयार करा व नंतर खोदकामसाठी पारवानगी द्या अशी एकमताने यावेळी नगरसेकांनी मागणी केली. ही मागणी महापौरांनी मान्य केली असून पणजी शहराच्या नवीन आराखडा तयार केल्यावर या ठिकाणी खोदण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे .पावसाळय़ात जर रस्ते खोदले तर ते वाहनाधारकांना तसेच लोकांना त्रासदायक ठरणार आहे.

मनपाच्या नविन ईमारती विषयी चर्चा

 यावेळी महापौरांनी मनपाची नवीन ईमारतीविषयी नगसेकांना माहिती दिली.  नगसेवकांना या नविन ईमारती विषयी व बांधकामाविषयी माहिती देण्याचे आवाहन यावेळी महापौरांकडे केले. महापौरांनी सर्व नगरसेवकांच्या सुचना ऐकून या ईमारतीचा आराखडा तयार केला जाणार असून नंतर तो मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार असल्याचे सांगितले.

 याबैठकीमध्ये सोपो कर व पे पार्किगचा विषय आला. सध्या मार्केटचा सोपो कर मनपाची समिती गोळा करत असून यासाठी दिवसाला 18 हजार रुपये कर गोळा केला जातो, असे यावेळी महापौरांनी सांगितले. तसेच पे पार्पिंगचा कंत्राटदाराने फसविल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे त्यांना पुन्हा दसऱया कंत्राटदाराला कंत्राट दिले जाणार आहे. पणजीत वाहतुकीवर शिस्त आणण्यासाठी ही पे पार्किग केली जात आहे, असे यावेळी महापौरांनी सांगितले.

 आल्तिनो येथे नविन बांधण्यात येणाऱया गार्डनविषयी चर्चा करण्यात आली. हे गार्डन धेंपो कंपनी बांधत असून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पोनसीबिलीटी’ या नात्याने ते बांधले जात आहे .या गार्डनाची 3 वर्षे काळजी कंत्राटदार घेणार असून नंतर मनपा या काळजी घेणार आहे.

 यावेळी मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर व महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना विरोधक पांडुरंग राऊतदेसाई, मिनिन डिपुझ वैदई नार्कइ व रुपेश हळर्णकर यांनी विविध प्रश्न विचारुन धारेवर धरले.