|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरण ; आरोपी गायकवाडला सशर्त जामीन मंजूर

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरण ; आरोपी गायकवाडला सशर्त जामीन मंजूर 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामीनकाळात समीर गायकवाडला न्यायालयात पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.

जामीन मिळावा यासाठी समीर गायकवाड याने न्यायालयात अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली. न्यायालयाने गायकवाड यास 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने गायकवाड यास कोल्हापूर जिह्यात येण्यास बंदी घातली असून, दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जामीनकाळात निवासाचा पत्ता देणे बंधनकारक केले आहे.

Related posts: