|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी 

ओरोस  : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मठ (वेंगुर्ले) येथील रवींद्र उज्वल मठकर या 36 वर्षीय मनोरुग्ण तरुणाने रुग्णालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्याला बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

   दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णाने कर्मचाऱयांची नजर चुकवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने रुग्णालयातील रुग्ण सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मठ येथील रवींद्र हा मनोरुग्ण आहे. त्याने यापूर्वी दोनवेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काही कामानिमित कणकवलीत गेला असता त्याला अचानक फिट आल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याने रविवारी  रोजी आपल्या मनगटाची नस कापली होती. त्यामुळे अधिक उपचारासाठी रविवारीच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला शस्त्रक्रिया रुग्ण विभागात ऍडमिट करून ठेवण्यात आले होते.

  या तरुणाची 19 रोजी सायंकाळी पाच वाजता मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश धुरी यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर 15 मिनिटांनी त्याने वॉर्डमधील नर्सची नजर चुकवून बाहेर जात सुमारे 15 ते 18 फूट उंचीवरून खाली उडी घेतली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. लागलीच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून गोवा येथे पाठविल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.

Related posts: