|Monday, September 23, 2019
You are here: Home » Automobiles » तब्बल 26 लाखांत मिळणार ही बुगाटीची सायकल !

तब्बल 26 लाखांत मिळणार ही बुगाटीची सायकल ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध लग्झरी कार निर्माता कंपनी बुगाटीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी सायकल लाँच केली आहे. बुगाटी कंपनीने एका दुचाकी निर्माता कंपनीच्या साहाय्याने ही सायकल लाँच केली आहे. या नव्या सायकलची किंमत तब्बल 26 लाख रुपये असणार आहे.

ही नवी सायकल वजनाने हलकी असून, या सायकलीचे वजन फक्त 5 किलो असणार आहे. ही सायकल सामान्य सायकलींप्रमाणे सगळ्या रस्त्यांवर वापरण्यासारखी आहे. विमान बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱया मटेरिअलपासून ही बुगाटीची सायकल तयार करण्यात आली आहे. या सायकलमध्ये चेनच्या जागी बेल्ट लावण्यात आला आहे. या सायकलला पॅडलच्या माध्यमातून चालवता येणार आहे. ही सायकल विविध कलर्सच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.