|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » प्राप्तिकर विभागाकडून मीसा भारतींची 6 तास चौकशी

प्राप्तिकर विभागाकडून मीसा भारतींची 6 तास चौकशी 

पाटणा :

 राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांच्या मालमत्तेवर सोमवारी टाच आणल्यानंतर बुधवारी प्राप्तिकर विभागाने त्यांची दीर्घकाळ चौकशी केली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार ही चौकशी 6 तासांपर्यंत चालली आहे. प्राप्तिकर विभागाने दोनवेळा मीसा भारती आणि तिचा पती शैलेश यांच्याविरोधात समन्स जारी केले होते. आता मीसा, तेजस्वी आणि शैलेश यांना संबंधित मालमत्ता वैधमार्गाने खरेदी करण्यात आल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. याआधी सोमवारी प्राप्तिकर विभागाने मीसा भारती यांच्या 4 मालमत्तांवर बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत टाच आणली होती. आता मीसा यांना या मालमत्ता वैध रकमेने खरेदी करण्यात आल्याचे सिद्ध करून दाखवावे लागेल, अन्यथा प्राप्तिकर विभाग पुढील मोठी कारवाई करू शकतो. विभागाने 6 आणि 12 जून रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता, परंतु मीसा दोन्हीवेळा हजर राहिल्या नव्हत्या. लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. याआधी लालूंचा पुत्र आणि मंत्री तेजप्रताप यादव याच्या पेट्रोलपंपाचा परवाना बीपीसीएलने रद्द केला होता. चुकीच्या मार्गाने परवाना मिळविण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली होती.