|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार

जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार 

सोलापूर —

 राज्यातील 27 जिल्हा बँकांकडे रद्द झालेल्या 1000 व 500 रूपयांच्या जुन्या 2771 कोटी रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदीला दाखविला असल्याची माहिती महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 पाटील हे कार्यक्रमानिमित्त सोलापुरात आले होते. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे राज्य सरकारला कळविताच मुंबईला राष्ट्रीयकृत बँकांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविली. त्यामुळे बैठकीला जाण्यासाठी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर विमानतळावरून मुंबईला रवाना होण्यापूर्वी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. नोटबंदीनंतर या नोटा जमा करण्यासाठी बँकांकडून मागणी होती. राज्यातील बँकांकडे पडून असलेल्या नोटांची पुरेशी तपासणी करून त्या स्विकारण्यासाठी मान्यता मिळाल्याने कर्जमाफीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. योग्यवेळी चांगला निर्णय घेतल्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे मी आभार मानतो, असेही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. 

 10 हजार रूपयांचे अग्रीम कर्ज देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही अनेक बँका टाळाटाळ करीत आहेत. त्याकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कलम 89 नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज देणे क्रमप्राप्त आहे. हे कर्ज देण्यास नकार देणाऱया बँकांवर कारवाई केली जाईल. या बँकांकडे पैसा नसेल तर त्यांनी तो राज्य सहकारी बँकांना मागावा. या पतपुरठय़ाची हमी राज्य सहकारी बँकांनी दिली आहे, याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. 

Related posts: