|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आषाढी आली तरी चंद्रभागा मैलीच…

आषाढी आली तरी चंद्रभागा मैलीच… 

पंढरपूर / प्रतिनिधी

आषाढी यात्रेची लगबग सुरू झाली. तरी देखिल वारकरी भाविकांची बहिण असलेली चंद्रभागा मैलीच आहे. याचसाठी सरकारने नमामि चंद्रभागा अभियानाच्या निमित्ताने सांडपाणी रोखण्यासाठी समिती स्थापन केली मात्र जे काम अभियानाची सुरूवात होऊन एक वर्षात झाले नाही. ते आता समितीच्या माफ्&ढत किंवा येथील प्रशासनाच्या वतीने आषाढीपूर्वी तरी होणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

  सरकारने चंद्रभागेच्या शुध्दीकरणासाठी एक वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत नमामि अभियानाचा श्रीगणेशा केला. यानंतर नमामिच्या विकासाचे टप्पे ठरविण्यात आले. मात्र यामधे कुठेही शुध्दीकरणाचा प्रश्न अजेंडयावर येऊन त्याचे काम सुरू होताना दिसले नाही. याबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे नमामि संदर्भात बैठक घेतली. यामध्ये चंद्रभागेतील सांडपाणी आणि घनकचरा यांचे नियोजन करण्यासाठी निरी या समितीची देखिल नेमणूक केली आहे. यासाठी काही कोटय़वधीचा निधी देण्यासह सरकारने पुढाकार घेतला आहे.

गेल्यावर्षी देखिल नमामिचे उद्घाटन झाले. अर्थसंकल्पात निधी मंजूर झाला. यासंबंधी अनेक संकल्पचित्रे दाखविण्यात आले. मात्र वर्षभरातील नमामि चंद्रभागा अभियानाचा लेखाजोखा पाहिला. तर संपूर्णपणे शून्य असलेला दिसून येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सांडपाणी रोखण्यासाठी तयार केलेला आराखडा आणि समितीची केलेली नेमणूक ही कधी काम करणार? आणि चंद्रभागा कधी शुध्द होणार? हे प्रश्न भेडसावताना दिसत आहे. कारण अभियानाची सुरूवात होउन जे एक वर्षात झाले नाही. त्याला आता तरी मुहूर्त मिळेल का? की हे अभियान मंत्रालयातील फ्ढाईलमधेच राहील? हे पाहणे महत्वाचे आहे.

आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसावर आली आहे. अशामधेच मानांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले आहे. येत्या काही दिवसात पंढरीत सुमारे 12 लाखांच्या आसपास भाविक दाखल होण्याचे संकेत आहेत. यामधे प्रत्येक भाविकाला चंद्रभागा स्नानाचे करायचे असते. अशावेळी नदीपात्रात असणारा कचरा तसेच वनस्पती, सांडपाणी यामधेच भाविकाला स्नान करावे लागते. त्यामुळे आषाढीच्या पार्श्वभूमीवर तरी येथील प्रशासन जागे होउन सांडपाणी आणि चंद्रभागेतील कचरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार का? की मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीच्या सुचनेची आणि त्यांच्याच कार्यवाहीच्या निर्णयाची वाट पाहणार? हे येत्या काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    गरज स्वच्छता अभियानाची…

आषाढी यात्रेंच्या पार्श्वभूमीवर येथील चंद्रभागा स्वच्छ राहावी. तसेच नमामि अभियानांतर्गत येथे येणाऱया सांडपाण्याचा आणि कचऱयाचा निर्णय व्हावा. यासाठी आता प्रशासकीय कर्मचारी, वारकरी सांप्रदायिक, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेउन स्वच्छता अ†िभयान चंद्रभागेमधे करण्याची गरज निर्माण झाली आहे.