|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावातील एका बंगल्यावर उत्पादन शुल्क चा छापा

तासगावातील एका बंगल्यावर उत्पादन शुल्क चा छापा 

प्रतिनिधी/ तासगाव

तासगावातील सांगली नाका नजीक असलेल्या माजी नगरसेवक मोहन अग्नु कांबळे  यांच्या बंगल्यावर कोल्हापूर विभागीय उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी छापा टाकला. याछाप्यात देशी दारुच्या सुमारे 592 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी मोहन कांबळे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारु बंदी कायदा 1949 कलम 65 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाअसल्याची माहिती, तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली. अधिक माहिती अशी, कोल्हापूर विभागीय उत्पादनशुल्क विभागाचे भरारी पथक गेल्या काही दिवसापासून विविध ठिकाणी छापे टाकून बेकायदा दारु विक्री उघडकीस आणत आहे. बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहिती नुसार तासगाव सांगली रस्त्यावरील सांगली नाका येथे माजी नगरसेवक मोहन कांबळे यांच्या बंगल्याजवळ धाव घेतली. यावेळी या पथकाने टाकलेल्या छाप्यात मोठय़ाप्रमाणावर देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये 180 मिली च्या 446 बाटल्या व 90 मिलीच्या 146 बाटल्या अशा 592 या पथकात मिळून आल्या. हा सर्व मुद्देमाल या पथकाने ताब्यात घेवून जप्त केला आहे.

ही कारवाई सुरु असताना सांगली नाका परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान कारवाई केल्यानंतर रात्री उशीपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु होत्या. उत्पादनशुल्कच्या अधिकाऱयांची विचारणा केली असता, वरीष्ठ अधिकाऱयांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र उत्पादन शुल्कच्या उपविभागीय अधिकारी किर्ती शेंडगे यांनी त्वरीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले नंतर याबाबतच्या हालचाली गतीमान झाल्याअसल्याचे दिसून येत आहे. याबाबत भरारी पथकातील एस.एस. बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे. झालेल्या या मोठय़ा कारवाईची चर्चा तासगाव शहरात जोरदार होत होती.

Related posts: