|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतिपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतिपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सिताराम येचुरी यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. यापूर्वी एनडीएकडून राष्ट्रपतिपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आज झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कुमार यांच्या नावावर 17 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

 

Related posts: