|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लोखंडी गेटसह भिंत कोसळून चिमुरडीचा दुर्दैवी अंत

लोखंडी गेटसह भिंत कोसळून चिमुरडीचा दुर्दैवी अंत 

एमआयडीसी मिरजोळे येथे दुर्घटना

मृत बालिका मूळची कर्नाटकमधील

प्रतिनिधी /रत्नागिरी

लोखंडी गेटसह भिंत कोसळून 3 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरूवारी एमआयडीसी मिरजोळे येथे घडली आहे. येथील मोकळ्या प्लॉटवर अन्य लहान मुलांसह खेळताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मी शरणाप्पा म्यॅगेरी असे या बालिकेचे नाव असून ती मुळ कर्नाटकमधील आहे. पावसाच्या पाण्याने भिंत खचल्याने ती कोसळल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मूळची कर्नाटकमधील मल्लाबाण, जवर्गे (जि.गुलबर्गा) येथील राहणारी आहे. वडील शरणाप्पा हे कुटुंबियांसह कामानिमित्त एमआयडीसी येथे सध्या राहत आहेत. 8 वर्षे ते येथे राहत असून एमआयडीसीत ते रोजंदारीवर कामाला आहेत. लक्ष्मीचा एक भाऊ तिच्यापेक्षा मोठा तर एक पाच महिन्यांचा आहे.

गुरूवारी सकाळी 10.30 च्या सुमारास लक्ष्मी परिसरात तेथीलच अन्य दोन मुलांबरोबर खेळत होती. बराच वेळ ही मुले याठिकाणी खेळत होती. खेळत खेळत लक्ष्मी तेथील एका दुसऱया प्मलॉटजवळ आली. यावेळी या प्लॉटचे लोखंडी गेट अंदाजे साडेचार फूट ऊंचीच्या भिंतीसह तिच्या अंगावर कोसळले. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या छाती व डोक्याला मुका मार लागला. नाका तोंडातून रक्त बाहेर येऊ लागले.

या दुर्घटनेबद्दल शरणाप्पा यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीली गंभीर दुखापत झालेली बघून त्यांनी तिला ताबडतोब जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले. दुपारी 12.50 च्या सुमारास रूग्णालयात आणल्यावर तपासून लक्ष्मी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ग्रामीण पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल विभुतेंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील याविषयी अधिक तपास करत आहेत.

Related posts: