|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अफगाणमध्ये बॉम्बस्फोट, 29 जणांचा मृत्यू

अफगाणमध्ये बॉम्बस्फोट, 29 जणांचा मृत्यू 

काबुल :

अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांताच्या लश्करगाह येथे कारबॉम्ब स्फोट होऊन 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या स्फोटामुळे 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लष्कर आणि पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

वृत्तसंस्था शिन्हुआनुसार गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका बँक शाखेत हा स्फोट घडविण्यात आला. यादरम्यान रांगेत नागरिकांसह लष्करी आणि पोलिसांचे जवान देखील होते. हल्ल्यावेळी अनेक नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी इमारतीत प्रवेशाची प्रतीक्षा करत होते. यादरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने लोकांजवळ कार नेत स्फोट घडवून आणला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

Related posts: