|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » वाघांचा गड होण्याच्या दिशेने ओरांग अग्रेसर

वाघांचा गड होण्याच्या दिशेने ओरांग अग्रेसर 

गुवाहाटी/ वृत्तसंस्था :

आसामसह बहुतेक राज्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाघांची संख्या वाढली आहे. पर्यटनाच्या नकाशावर तुलनेने कमी लोकप्रिय असणारे ओरांग नॅशनल पार्क वाघांचा गड म्हणून भारतात सर्वात प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची जागा मिळविण्याच्या जवळ पोहोचले आहे.

घनतेच्या दृष्टीने कोण-कुठे

ओरांग नॅशनल पार्क                   35.44

काझीरंगा नॅशनल पार्क   12.72

जिम कार्बेट पार्क                       11

बंदीपूर नॅशनल पार्क                  10.28

(टिप : आकडेवारी मार्च 2017 पर्यंत प्रति 100 चौरस किलोमीटरच्या कक्षेत असणाऱया वाघांची आहे.)

 

सातत्याने वाढणारी वाघांची संख्या

2226

एकूण वाघ देशभरात असल्याचा दावा करण्यात आला 2014 साली

2600

एकूण वाघांची संख्या पोहोचू शकते 2018 साली प्राधिकरणानुसार

(6 ते 7 टक्के दराने वाघांची संख्या वाढत आहे, वाघ संरक्षण अधिकाऱयांनुसार)

 

भारतात सर्वाधिक वाघ

2016 साली जगभरात 3890 वाघ असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. भारतानंतर रशियात वाघांची संख्या सर्वाधिक 433 एवढी होती. इंडोनेशियात 371, मलेशियात 250, नेपाळमध्ये 198, थायलंडमध्ये 189, बांगलादेशमध्ये 106, भूतानमध्ये 103 आणि चीनमध्ये 7 वाघांचे अस्तित्व आढळून आले होते.

Related posts: