|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » ‘फोर्ड’कडून 39 हजार कार रिकॉल

‘फोर्ड’कडून 39 हजार कार रिकॉल 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेच्या फोर्ड या कंपनीने देशात विक्री करण्यात आलेली 39,315 वाहने रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. फिएस्टा क्लासिक आणि मागील पिढीतील फिगो मॉडेल्सच्या स्टिअरिंगमध्ये चुका आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. 2004 ते 2012 दरम्यान कंपनीच्या चेन्नईमधील प्रकल्पातून उत्पादन घेण्यात आलेल्या या दोन मॉडेल्सना तपासणीसाठी बोलाविण्यात येतील. कंपनीकडून 39 हजार कारची तपासणी करण्यात येत आहे. उच्च दाबाची क्षमता असणाऱया स्टिअरिंग होजमध्ये (रबरी नळी) समस्या असल्याचे आढळून आले आहे.

कंपनीकडून नादुरुस्त असणाऱया सर्व कारमधील ही रबरी नळी बदलून देण्यात येईल. आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करता कार रिकॉल करण्याचा निर्णय स्वयंपूर्ततेने घेण्यात आला असे कंपनीने म्हटले.

फोर्ड इंडियाकडून यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये फिगो आणि फिएस्टा क्लासिक मॉडेलच्या 1,66,021 युनिट्सचे रिकॉल करण्यात आले होते. त्यावेळी रिअर ट्विस्ट बीम आणि पॉवर स्टिअरिंग होजमध्ये चुका असल्याचे आढळून आले होते. याव्यतिरिक्त गेल्या वर्षी नवीन हॅचबॅक प्रकारातील फिगो आणि कॉम्पॅक्ट सेडान फिगो अस्पायरच्या 42,300 युनिट्स, तसेच नोव्हेंबर 2015 मध्ये एसयूव्ही इकोस्पोर्ट्सच्या 16,444 युनिट्सचे रिकॉल करण्यात आले
होते. 

Related posts: