|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » बाजारातील सर्व क्षेत्रांत घसरण

बाजारातील सर्व क्षेत्रांत घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 152, एनएसईचा निफ्टी 55 अंशाने घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

भांडवली बाजारात नफेखोरी दिसून आल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत बंद झाले. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 31,110 आणि निफ्टी 9,565 पर्यंत घसरले होते. ईदनिमित्त सोमवारी भांडवली बाजार बंद राहील.

बीएसईचा सेन्सेक्स 152 अंशाने घसरत 31,138 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 55 अंशाने कमजोर होत 9,575 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात जोरदार विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.25 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरला.

बँकिंग, वाहन, धातू, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात सर्वात जास्त विक्री झाली. बँक निफ्टी 0.8 टक्क्यांनी घसरत 23,542 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्के, वाहन निर्देशांक 1.7 टक्के आणि धातू निर्देशांक 0.7 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 0.9 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 1 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1 टक्का आणि तेल आणि वायू निर्देशांकात 1.1 टक्क्यांनी कमजोरी आली. साधारण सर्व क्षेत्रात घसरण होत बंद झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

पॉवरग्रिड, वेदान्ता, अरबिंदो फार्मा, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, विप्रो, डॉ. रेड्डीज लॅब आणि सिप्ला 1.8-0.4 टक्क्यांनी वधारत बंद झाले. बँक ऑफ बडोदा, आयओसी, टाटा मोटर्स डीव्हीआर, बॉश, हीरो मोटो, एसबीआय आणि ओएनजीसी 2.6-1.6 टक्क्यांनी कमजोर झाले.

मिडकॅप समभागात भारत फोर्ज, टाटा कम्युनिकेशन्स, एमआरपीएल, ओबेरॉय रिअल्टी आणि एल ऍण्ड टी फायनान्स 3.9-3.3 टक्क्यांनी कमजोर झाले. स्मॉलकॅप समभागात फोर्टिस हेल्थ, आयएफबी ऍग्रो, फ्यूचर एन्टरप्रायजेस, डेल्टा कॉर्प आणि केसर टर्मिनल्स 13-6.25 टक्क्यांनी घसरले.

या आठवडय़ात सेन्सेक्स 0.3 टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी 0.1 टक्क्यांनी घसरला.

Related posts: