|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » सलग तीन दिवस बँका बंद राहणार

सलग तीन दिवस बँका बंद राहणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रोखीचे व्यवहार करणाऱयांना पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आज चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते. तर उद्या रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात भर पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात एटीएममधील मोठय़ाप्रमाणात रोख रक्कम काढली जाते. त्यामुळे एटीएम रिकामे होऊ नयेत, यासाठी एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्यात आल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारावर सर्वाधिक भर दिला असला, तरी रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. त्यामुळे एटीएमवर भार पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बँकांकडून सातत्याने ऑनलाइन अथवा डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचे आवाहान केले आहे.

 

Related posts: