|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » मीरा कुमार यांच्या सुरक्षेत वाढ ; झेड प्लस सुरक्षा तैनात

मीरा कुमार यांच्या सुरक्षेत वाढ ; झेड प्लस सुरक्षा तैनात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मीरा कुमार यांना देण्यात आलेली एक्स श्रेणीतील सुरक्षेत वाढ करत झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे.

विरोधी पक्षांकडून गुरुवारी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. झेड प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर आता मीरा कुमार यांच्याबरोबर 24 तास दिल्ली पोलिसांचे सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान असतील. यूपीए 2 मधील मनमोहनसिंग सरकारच्या काळात मीरा कुमार या पाच वर्षे लोकसभेच्या अध्यक्षा होत्या.

मीरा कुमार यांना सध्या एक्स श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येते. या श्रेणीची सुरक्षा असलेल्या व्यक्तींना अर्ध स्वयंचलित रायफल असलेला एक सुरक्षा कर्मचारी पुरवण्यात येतो. झेड प्लसची श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर मीरा कुमार यांच्याबरोबर आता 36 सुरक्षा कर्मचारी असतील.