|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला ; सीआरपीएफचा एक जवान शहीद

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला ; सीआरपीएफचा एक जवान शहीद 

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. सीआरपीएफच्या गाडीला निशाणा करत हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, 2 जण गंभीर जखमी झाले.

सीआरपीएफच्या तळावर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी तेथील एका शाळेत घुसले. त्यांना पकडण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेरले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मागील वर्षी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील या परिसराला दहशतवाद्यांनी निशाणा बनवला होता. त्यानंतर आज दहशतवाद्यांनी हा दहशतवादी हल्ला केला.

Related posts: