|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » पाकिस्तानात तेलाच्या टँकरला भीषण आग ; 123 जणांचा मृत्यू

पाकिस्तानात तेलाच्या टँकरला भीषण आग ; 123 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / बहावलपूर :

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहालवपूर येथे तेलाच्या टँकरला आज भीषण आग लागली. या आगीत 123 जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील अहमदपूर शरिया येथे राष्ट्रीय महामार्गावर तेलाचा टँकर उलटला. या टँकरमधून तेलाची मोठय़ा प्रमाणात गळती सुरु झाल्याने हे तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी टँकरजवळ धाव घेतली. मात्र, त्याचदरम्यान टँकरचा स्फोट झाला. त्यामुळे तेल घेण्यासाठी आलेल्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.

Related posts: