|Thursday, November 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘लागिरं झालं जी’मध्ये रमजान ईद

‘लागिरं झालं जी’मध्ये रमजान ईद 

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी, गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत. सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट सांगणारी ही मालिका झी मराठीवर नुकतीच सुरू झाली आहे. कमी वेळातच मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत आणि राहुल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी, तिकडे घडणाऱया गमती जमती, अज्या- शीतलीने खोडय़ा काढत एकमेकांवर कुरघोडी करणे या गोष्टी पसंतीस उतरत आहेत. याच मालिकेत आता प्रेक्षकांना ईद साजरी होताना बघायला मिळणार आहे. शीतलची मैत्रीण यास्मिनच्या घरी सर्व जण रमजान ईदनिमित्ताने एकत्र येणार असून ईद मुबारक म्हणत शिरखुर्माचा आस्वादही घेणार आहेत. 26 जूनला रमजान ईदच्या दिवशी लागीरं झालं जीचा हा विशेष भाग सायंकाळी 7 वाजता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

शीतलची मैत्रीण असलेली यास्मिन आणि तिच्या कुटुंबियांसोबत सर्व जण ईद साजरी करणार आहेत. तिथे नेमके काय घडणार आणि ईदचा आनंद हे सर्वजण कसे लुटणार हे या भागात बघायला मिळणार आहे.

Related posts: