|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतदारसंघात सर्वाधिक 600 कोटींची विकासकामे

मतदारसंघात सर्वाधिक 600 कोटींची विकासकामे 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक राज्याच्या विधानसभा क्रमवारीत पहिला आहे. क्रमवारीत असणारा पहिला क्रमांक विकासकामातही प्राप्त होण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न गेल्या चार वर्षात सुरू आहेत. याचेच फलित म्हणून मतदारसंघात सर्वांधिक 600 कोटींची विकासकामे पूर्णत्वाला आली आहेत, असे प्रतिपादन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले.

निपाणी येथे अकोळ रोडवरील पार्वती कॉर्नर ते हालसिद्धनाथ मंदिरपर्यंत बसविण्यात आलेल्या पथदीप प्रज्वलन शुभारंभ रविवारी करण्यात आला यावेळी ते बोलत होते. प्रारंभी एस. के. साजण्णावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते पथदीप प्रज्वलन शुभारंभ करण्यात आला.

बसवप्रसाद जोल्ले पुढे म्हणाले, पार्वती कॉर्नर ते हालसिद्धनाथ मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण, पदपथ, दुभाजक, पथदीप या कामासाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्याने हा मार्ग आता हायटेक दिसत आहे. या रस्ताकामातून निपाणीच्या वैभवात भर पडली आहे. येत्याकाळात अशीच विकासाची घोडदौड सुरू राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाला शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, हालशुगरचे संचालक एम. पी. पाटील, जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, आकाश शेट्टी, प्रणव मानवी, सुभाष लोळसुरे, महादेव बरगाले, सुधीर प्रताप, रमेश वैद्य, गणू गोसावी, नगरसेवक दीपक माने, उदय पाटील, रवी गुळगुळे, सूरज खवरे, माणिक सुर्यवंशी, विजय वरुटे, अक्षय यादवाड, अमोल सूर्यवंशी, प्रकाश कुलकर्णी, धनाजी भाटले, प्रदीप मुधाळकर, रोहीत यादव, मोहन बोधले, सतीश ओगले यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होत्या. सचिन चौगुले यांनी आभार मानले.

Related posts: