|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उधाणाच्या भरतीने किनाऱयावर लाटांचे थैमान

उधाणाच्या भरतीने किनाऱयावर लाटांचे थैमान 

प्रतिनिधी /रत्नागिरी

पावसाळय़ात समुद्राला येणाऱया उधाणाने दरवर्षी किनारपट्टीला तडाखा बसतो. अजस्त्र लाटांच्या किनाऱयावर धडकण्यामुळे या किनाऱयाला राहणाऱया नागरिकांच्या पोटातही भितीचा गोळा उठतो. सोमवारीही समुद्राला प्रचंड उधाण येऊन अजस्त्र लाटांनी किनाऱयावर जणू थैमान घातले.

पावसाला प्रारंभ होताच समुद्र खवळतो. या खवळलेल्या समुद्रात मच्छिमारीसाठी जाणेही टाळले जाते. या कालावधीत अन्य दिवसांपेक्षा काही ठराविक दिवशी समुद्राला येणाऱया उधाणाने किनाऱयावरील नागरिकांना खबरदारीचे आवाहन प्रशासनस्तरावरून केले जाते. 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा संभव या उधाणाच्या दिवशी वर्तवण्यात येतो. त्यामुळे उसळणाऱया लाटांचे पाणी किनाऱयालगतच्या वस्त्यांमध्ये अनेकवेळा घुसते.

सोमवार 25 जून रोजी समुद्राला आलेल्या उधाणाच्या मोठय़ा भरतीचा प्रत्यय आला. पावसाचा वेग रत्नागिरीतील किनारपट्टीकडील काही भागात कमी असला तरीही या उधाणामुळे अनेक ठिकाणी समुद्राने अतिक्रमण केल्याचे दिसून येत होते. पण कितीही उधाण आले तरी समुद्र आपली मर्यादा ओलांडत नसल्याचे किनारी भागात राहणारे नागरिक सांगतात. पण अलिकडील काळात किनारी भागातील मानवी अतिक्रमणामुळे समुद्राचेही किनारीभागात अतिक्रमण होत आहे. किनारा रक्षणासाठी कितीही प्रतिबंधात्मक उपयायोजना केल्या गेल्या तरी त्या तकलादू ठरतात. त्याचा प्रत्यय मिऱया येथे नेहमीच येतो. उधाणाच्यावेळी येथील धूपप्रतिबंधक बंधारा ओलांडून अजस्त्र लाटा नेहमीच अतिक्रमण करतात. त्यामुळे त्याठिकाणी केल्या जाणाऱया उपाययोजनाही कमी पडत असल्याचे दिसून येते.

Related posts: