|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » टीडीएस-टीसीएसमधून ई-व्यापाराला सूट

टीडीएस-टीसीएसमधून ई-व्यापाराला सूट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जीएसटी लागू करण्यासाठी आता चार दिवस शिल्लक असताना सरकारने ई व्यापार कंपन्यांना टीडीएस (स्त्रोतमूलक प्राप्तिकर) आणि टीसीएस (स्त्रोतमूलक करसंकलन)मधून सलवत देण्यात आली आहे. यामुळे जीएसटीमध्ये पुरवठादारांना देयक दिल्यावर ई व्यापार कंपन्यांना 1 टक्के टीसीएस द्यावा लागणार नाही. याव्यतिरिक्त सरकारने ई व्यापार प्लॅटफॉर्मवर उत्पादनांची विक्री करणाऱया लहान व्यावसायिकांना जीएसटी नोंदणीतून सूट दिली आहे. जीएसटी लागू करणे सहजसोपे व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.

वितरकांना देयक देताना ई व्यापार कंपनीला आता 1 टक्के टीसीएस द्यावा लागणार नाही. टीसीएसमुळे जीएसटीच्या प्रारंभीच्या काळात कोणतीही समस्या उद्भवता नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केंदीय जीएसटी कायद्यानुसार 2.5 लाखापेक्षा अधिक किमतीच्या सेवा आणि वस्तूच्या पुरवठादारांना 1 टक्का टीडीएस द्यावा लागणार आहे. 20 लाखापेक्षा कमी उलाढाल असणाऱया कंपन्यांना जीएसटीमध्ये नोंदणी करावी लागणार नाही. एखादा विक्रेता ई व्यापार कंपनीच्या माध्यमातून 20 लाखापेक्षा कमी उलाढाल करत असेल तर त्याला सवलत देण्यात आली.

व्यापार आणि उद्योग क्षेत्राबरोबर चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सरकारने सीजीएसटी आणि राज्य जीएसटी कायदा 2017 मध्ये टीडीएस आणि टीसीएस 1 जुलैपासून लागू होणाऱया जीएसटीमध्ये स्थगित करण्यात आला आहे. यामुळे लहान व्यापारी आणि ई व्यापार कंपन्यांसाठी वातावरणनिर्मिती होईल असे सरकारला वाटते.

Related posts: