|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘मोदी फेस्ट’ प्रदर्शनाचे पणजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

‘मोदी फेस्ट’ प्रदर्शनाचे पणजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

 पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालीर केंद्र सरकारने मागील तीन वर्षात अनेक योजना राबविल्या असून या योजनांचा लाभ देशातील गरीब जतनेला झाला आहे. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने देशभर ‘मोदी फेस्ट’ आयोजित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

 मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याने कला अकादमीमध्ये विविध योजनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल सोमवारी झाले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून आणखी दोन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे.

 मगील तीन वर्षात अनेक विकासाभिमुख अशा योजना सरकारने राबविल्या आहेत.  या योजनांचा लाभ देशातील कोटय़वधी लोक घेत आहेत. अजूनही काही ठिकाणी लोकांना या योजना माहीत नाहीत. देशातील कानाकोपऱयातील लोकांना सरकारने सुरु केलेल्या योजनांची माहिती मिळावी व त्यांना या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी हे प्रदर्शन देशभर सुरु करण्यात आले आहे. मोदी सरकार सत्तेवर येताच गरिबांसाठी, शेतकऱयांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अशा विविध योजना राबविल्या आहेत.

 ‘प्रधानमंत्री जन धन योजना’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘डिजिटल इंडिया’, शेतकऱयांसाठी ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’, ‘मेक इन इंडिया’, अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. 

 जीएसटीचा सामान्य जनतेला तसेच शेतकऱयांना फायदा होणार आहे. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. सरकारने सामान्य जनतेच्या विकासासाठी अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत, असे  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व पक्षाचे सचिव सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

खाण घोटाळय़ासंदर्भात अहवालानंतर निर्णय : पर्रीकर

गोव्यातील रु. 35000 कोटींच्या खाण घोटाळय़ासंदर्भात पोलीस खात्याचे विशेष पथक (एसआयटी) चौकशी करीत असून त्याचा अहवाल आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की नाही हे ठरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. जीएसटीबाबतचे गैरसमज दूर होत असून सरकारी यंत्रणा त्याच्या कार्यवाहीसाठी सज्ज आहे. जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल तसेच जनतेला त्यासंदर्भात विविध माध्यमांतून माहिती देऊन शिक्षित करण्यात येणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.

Related posts: