|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » 2018 पासून आर्थिक वर्ष बदलणार ? ; केंद्राच्या हालचाली सुरु

2018 पासून आर्थिक वर्ष बदलणार ? ; केंद्राच्या हालचाली सुरु 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

येत्या 2018 वर्षापासून आर्थिक वर्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून, आता हा महिना बदलून जानेवारीपासून नवे आर्थिक वर्ष सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 2018 पासून आर्थिक वर्षाची सुरुवात जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यापासून आर्थिक वर्षाला सुरु होते. यात बदल करण्याच्या हालचाली केंद सरकारकडून करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष बदलल्यास पुढील वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प नोव्हेंबरमध्ये सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच कॅलेंडर वर्षाप्रमाणे आर्थिक वर्षातही बदल करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने सरकारचे काम वेगाने सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी या बदलाचे स्वागत केले आहे. असे झाल्यास हा एक ऐतिहासिक बदल असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पात सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर आता हा निर्णय घेण्याबाबतच्या केंद्राकडून हालचाली सुरु केल्या आहेत.

Related posts: