|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आंतरराष्ट्रीय एटीएम सेवेला 50 वर्षे पूर्ण

आंतरराष्ट्रीय एटीएम सेवेला 50 वर्षे पूर्ण 

लंडनमध्ये कार्यान्वित झाले होते पहिले एटीएम : पत्नीच्या सूचनेवरून 6 वरून 4  अंकांवर आला पिन

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

 ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच एटीएम सेवेने मंगळवारी 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या सेवेचा प्रवास लंडनमधून सुरू झाला आणि आपल्या 50 वर्षांच्या प्रवासात ही सेवा जगभरातील कानाकोपऱयापर्यंत पोहोचली आहे.  भारतात एटीएम 90 च्या दशकामध्ये फक्त मोठय़ा शहरांपुरते मर्यादित होते. परंतु आता ही सेवा मोठय़ा शहरांमधून आता छोटय़ा शहरांमध्ये, गावांमध्ये पोहोचली आहे. एटीएम आज काळाची गरज झाली असून याचे महत्त्व नोटाबंदीच्या वेळी भारतीयांनी पूर्णपणे उमगले आहे.

एटीएमचा पव्रास

जगातील पहिल्या एटीएमने 27 जून 1967 रोजी उत्तर लंडनच्या इनफील्ड भागात काम करणे सुरू केले होते. हे एटीएम बार्कलेज बँकेने आपल्या शाखेत बसविले होते. या यंत्राच्या विकासाचे शेय जॉन शेफर्ड-बॅरोन आणि त्यांच्या अभियांत्रिकी पथकाला दिले जाते. एक ब्रिटिश प्रिटिंग कंपनी डे ला रू ने ऑटोमेटेड कॅश सिस्टीम मशीन तयार केले होते. चॉकलेट व्हेडिंग मशीन पाहून एटीएम निर्मितीची कल्पना सुचल्याचे बॅरोन यांनी सांगितले होते. भारतातील पहिले एटीएम 1987 साली सुरू झाले होते. एचएसबीसी म्हणजेच हाँगकाँग अँड शांघाय बँक कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबईतील आपल्या शाखेत हा एटीएम स्थापन केला होता.

एटीएम पिनशी संबंधित महत्त्वाची माहिती

?जॉन शेफर्ड बेरॉनने एटीएम व्यवहार सुरक्षित करण्यासाठी 6 अंकांच्या पासवर्डचा प्रस्ताव ठेवला.

?परंतु आपल्या पत्नीमुळे त्यांना यासंबंधीचा
प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता.

?बेरॉन यांच्या पत्नीला कमाल 4 अंकांपर्यंतची
संख्याच स्मरणात राहत होती.

?पत्नीची अडचण दूर करण्यासाठी बेरॉन यांनी
एटीएमचा पासवर्ड 4 अंकांचा केला.

विक्रम नोंदविणारा एटीएम

?पाकिस्तानच्या खंजरेब दर्रा येथे सर्वाधिक 15,397 फूटाच्या उंचीवर एटीएम स्थित आहे. याचे संचालन बँक ऑफ पाकिस्तानकडून केले जाते.

?भारतात 14300 फूटाच्या उंचीवर नाथु ला, सिक्किमध्ये एटीएम स्थापन करण्यात आले असून याचे संचालन यूनियन बँक ऑफ इंडियाकडून होते.

?देशातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुविधा आहे. एसबीआय ते उपग्रहाद्वारे संचालित करते.

 

Related posts: