|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मिरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मिरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जुलै महिन्यात होणाऱया राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मिरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मिरा कुमार यांनी आज अर्ज दाखल केला.

मिरा कुमार या पहिल्या महिला लोकसभा आध्यक्ष आहेत. पाच वेळा त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे स्थान भूषवले आहे. एनडीएकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी दलित उमेदवार दिल्यानंतर यूपीएकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर यूपीएकडून मिरा कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता रामनाथ कोविंद आणि मिरा कुमार यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

 

Related posts: