|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा आज जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी मुस्तफा डोसाच्या छातीत काल दुखत होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारांसाठी काल रात्री जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु त्याची प्रकृती अचानकपणे खालावली. यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी केली जात होती. यामध्ये डोसाच्या शिक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

 

Related posts: