|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » 25 जुलैनंतर भूमिका स्पष्ट करणार ; राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम

25 जुलैनंतर भूमिका स्पष्ट करणार ; राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम 

ऑनलाईन टीम / पुणे :

राज्य सरकारने शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. सरकारने सादर केलेली ही आकडेवारी संशयास्पद असून, त्यामुळे सरकारने कर्जमाफीची आकडेवारी द्यावी. तसेच सरकारमध्ये राहणार की नाही याबाबतची भूमिका 25 जुलैनंतर स्पष्ट करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारने राज्यातील शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली. या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद असल्याचे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरुन लक्षात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जर शेतकऱयांना लाभ होत असेल तर शेतकऱयांमध्ये एवढा असंतोष का निर्माण झाला आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ मोठे आकडे देऊन शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कृषी राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याबाबत ते म्हणाले, खोत यांची भूमिका इथून पुढे स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मानली जाणार नाही. त्यांना 4 जुलैपर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली असल्याचेही शेट्टी म्हणाले.

Related posts: