|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्नी आज मुंबईत बैठक

सीमाप्रश्नी आज मुंबईत बैठक 

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. 29 रोजी मुंबई येथे तज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱया सुनावणीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित या बैठकीमध्ये तज्ञ समितीचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीविषयी महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून पाठपुरावा व्हावा तसेच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वकिलांना योग्य सूचना मिळाव्यात, अशी समस्त सीमावासियांची अपेक्षा आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, आमदार अरविंद पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, निंगोजी हुद्दार, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे आदींसह इतर सदस्य मुंबईला रवाना झाले आहेत. मुंबई येथे मंत्रालयात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.  

Related posts: