|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » मोदींनी हिंसाचारी लोकांनाच पाठबळ दिले : असदुद्दीन ओवेसी

मोदींनी हिंसाचारी लोकांनाच पाठबळ दिले : असदुद्दीन ओवेसी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गोरक्षणाच्या बाबतीत हिंसाचार सहन करणार नाही असे म्हणणारे मोदीच असल्या हिंसाचारी लोकांनाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहेत. त्यामुळे गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना ठार करणाऱयांची हिंमत वाढते, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी फक्त मोठमोठय़ा घोषणा करतात. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याचे सोयीस्करपणे विसरतात. भाजपची ही नीती म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी गायीला वाचवण्यासाठी माणूस कसा काय मारता, अशा हिंसाचाराचे कधीही समर्थन करणार नाही, असे म्हणाले. याच मुद्यावरुन ओवेसी यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

Related posts: