|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 5 ऑगस्टला

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 5 ऑगस्टला 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी दिली. आयुक्त ए. के. ज्योती, ओ. पी. रावत यांचीही यावेळी उपस्थिती होती. निवडणूक अध्यादेश 4 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

उपराष्ट्रपतीपदाची ही 15 वी निवडणूक असून विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक असल्याचे सांगून झैदी म्हणाले, याच दिवसापासून उमेदवारी अर्जही दाखल करता येणार आहे. यासाठी 18 जुलै अंतिम तारीख आहे. 19 जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तसेच गरज पडल्यास 5 ऑगस्ट रोजी निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले. यासाठी लोकसभेचे 543 व 2 नामनिर्देशित सदस्य तर राज्यसभेचे 233 व 12 नामनिर्देशित असे एकूण 790 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. मतदानानंतर लगेचच सायंकाळी मतमोजणी करुन निकालही जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: