|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » गोरक्षणाच्या नावाने हिंसाचार अस्वीकारार्ह : मोदी

गोरक्षणाच्या नावाने हिंसाचार अस्वीकारार्ह : मोदी 

अहमदाबाद / वृत्तसंस्था :

अमेरिकासहीत तीन देशांचा विदेश दौरा यशस्वी करून परतलेल्या पंतप्रधान नरेंद मोदींचे गुरूवारी दोन दिवसीय दौऱयावर गुजरातमध्ये आगमन झाले.  राज्यातील साबरमतीपासून त्यांनी आपल्या दौऱयाची सुरूवात केली. प्रसिद्ध साबरमती आश्रमाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जनतेला संबोधीत करताना त्यांनी गौरक्षेच्या नावाने सुरू असलेल्या कथित हिंसाचाराची कठोर शब्दात निंदा केली आहे.

स्वंयघोषीत गोरक्षकाकडून देशातील विविध भागात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत आपले मौन तोडताना गोहत्येवरून सुरू असलेले हत्यासत्र  अस्वीकारार्ह असल्याचे मोदी म्हणाले. या संवेदनशील मुद्यावर भावुक होतानाच समाजात हिंसेला स्थान नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरक्षणारार्थ अहिंसेचे महत्त्व विषद करताना,  आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्याइतके गोरक्षणाबाबत कोणीच बोलले नसल्याचे त्यांनी सांगितले. गोमातेच्या संवेदनशीलतेविषयी सांगताना मोदींनी उपस्थितांना आपल्या लहानपणी ऐकलेली गोष्टही यावेळी ऐकवली. तसेच आपला देश हा अहिंसावादी देश आहे. महात्मा गांधीचा देश आहे, हे आपण का विसरतो. असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. काही हिंसक घटनांचा स्पष्टपणे उल्लेख करत वर्तमानात जे काही चालले हे अत्यंत क्लेषकारक असल्याचेही मोदी म्हणाले.

हिंसेद्वारे कधीच कोणत्याही समस्येचे निराकरण झालेले नाही आणि पुढेही होणे नाही. या देशात कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. असे खडसावून सांगतानाच महात्मा गांधीच्या स्वप्नातले भारत घडवण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन कार्य करावे. आमच्या स्वातंत्र्यसेनानींना अभिमान वाटेल असे भारत घडवू असे आवाहन ही मोदी यांनी यावेळी केला.

Related posts: