|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धनगरवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

धनगरवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला 

प्रतिनिधी /आजरा :

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील धनगरवाडी प्रकल्प गुरूवार दि. 29 रोजी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून सहा इंचाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या चार दिवसात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ होत असून हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

पश्चिम भागातील 115 द. ल. घनफूट पाणीसाठय़ाची क्षमता असलेला हा प्रकल्प गुरूवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. तालुक्यात गुरूवारी पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. चित्री प्रकल्पात 14 टक्के, एरंडोळ प्रकल्पात 30 टक्के तर खानापूर प्रकल्पात 21 टक्के पाणीसाठा झाला आहे.

गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात तालुक्यातील आजरा पर्जन्यमान केंद्रावर 22 मी. मी., उत्तूर-18, मलिग्रे-5 तर पश्चिम विभागातील गवसे केंद्रावर सर्वाधिक 65 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. चित्री धरण क्षेत्रात 24 तासात तब्बल 40 मी. मी. पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात तालुक्यात सरासरी 27.50 मी. मी. पाऊस झाला असून यंदाच्या हंगामात गुरूवार दि. 29 एखर 167 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Related posts: