|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » पुण्यात तब्बूच्या चित्रपटाचे शूटींग बंद पाडले

पुण्यात तब्बूच्या चित्रपटाचे शूटींग बंद पाडले 

ऑनलाईन टीम / पुणे :

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूची भूमिका असलेल्या ‘पियानो प्लेयर’ चित्रपटाचे पुण्यातील शूटींग बंद पाडण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी ट्रॉफीक जाम झाल्याची तक्रार झाल्यामुळे नगरसेविकेच्या पतीने हे चित्रीकरण बंद पाडले.

पुण्यातील खडकी कँन्टोन्मेंट परिसरात शुक्रवारी सकाळी 6.30 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत रस्ता बंद करून चित्रपटाचे शूटींग सुरू होते. रस्ता अडवल्याने परिसरात ट्राफिक जॅम झाला. याची तक्रार स्थानिकांनी नगरसेविका वैशाल पैहलवान यांच्याकडे केली. त्यानंतर नगरसेविकेचा पती कैलाश पैहलवान यांनी घटनास्थळी जाऊन शूटिंगची परवानगी घेतली आहे का, असा सवाल विचारला. परंतु परवानगीचे कोणतेही परिपत्रक टीमला दाखवता न आल्याने शूटिंग आवरते घेत यूनिटने काढता पाय घेतला.