|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होता ‘फिक्स’

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होता ‘फिक्स’ 

नागपूर / वृत्तसंस्था

18 जून रोजी लंडनमध्ये झालेला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ‘फिक्स’ झाला होता असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला 180 धावांनी पराभूत केले होते. आठवले यांच्यानुसार पूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली, परंतु अंतिम सामन्यात या संघाने नामुष्कीजनक पराभव पत्करला. यामुळे या सामन्यात निकालनिश्चिती करण्यात आल्याचे वाटत असल्याचे सांगत आठवले यांनी याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली.

भारतीय संघात दलित आणि आदिवासी समुदायाच्या खेळाडूंचा समावेश केला जावा असेही आठवले म्हणाले. आठवले हे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयात राज्यमंत्री आहेत. शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयी वक्तव्य केले आहे.

25 टक्के आरक्षण मिळावे

ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, त्यांना वगळले जावे, त्यांच्याजागी दलित समुदायाच्या पात्र क्रिकेटपटूंचा संघात समावेश केला जावा. क्रिकेट आणि उर्वरित क्रीडाप्रकारांमध्ये दलित आणि आदिवासी समुदायाच्या खेळाडूंना 25 टक्के आरक्षण मिळावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचे आठवले यांनी म्हटले.

Related posts: