|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पंचायतींच्या 15 प्रभागांसाठी 73.43 टक्के मतदान आज निकाल

पंचायतींच्या 15 प्रभागांसाठी 73.43 टक्के मतदान आज निकाल 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील 11 पंचायतींच्या 15 प्रभागांसाठी घेतलेल्या निवडणुकीत 73.43 टक्के एवढे मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. सर्वाधिक मतदान कुडका बांबोळी पंचायतीच्या प्रभाग 1 मध्ये झाले. 94.18 टक्के एवढे मतदान झाले. निकाल 2 रोजी जाहीर होणार आहे.

हणजुणे – कायसूव पंचायतीच्या प्रभाग 1 साठी 75.30 टक्के एवढे मतदान झाले. बस्तोडा पंचायतीच्या प्रभाग 1 साठी 80.19 टक्के एवढे मतदान झाले. पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या प्रभाग क्र. 8 साठी 62.62 टक्के तर प्रभाग 9 साठी 64.48 टक्के एवढे मतदान झाले. कुडका बांबोळी तळावली पंचायतीसाठी 94.18 टक्के मतदान झाले. मेरशी पंचायतीच्या प्रभाग 6 साठी 69.86 टक्के तर अडवलपाल पंचायतीच्या प्रभाग 5 साठी 86.10 टक्के मतदान झाले. बेतकी – खांडोळा पंचायतीच्या प्रभाग 6 साठी 82.49 व प्रभाग 7 साठी 84.43 टक्के मतदान झाले. सांकवाळ पंचायतीच्या प्रभाग 5 साठी 73.68 टक्के तर प्रभाग 6 साठी 74.17 टक्के मतदान झाले. बेताळभाटी पंचायतीच्या प्रभाग 5 साठी 70.03 टक्के तर प्रभाग 7 साठी 68.28 टक्के मतदान झाले. चांदोर – कावरे पंचायतीच्या प्रभाग 5 साठी 69.01 टक्के तर नुवे पंचायतीच्या प्रभाग 10 साठी 80.97 टक्के मतदान झाले.

Related posts: