|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांची सुटका

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांची सुटका 

तेल अवीव

: इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांची रविवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. ओलमर्ट यांची सुटका पॅरोल बोर्डाद्वारे त्याच्या शिक्षेत एक तृतीयांशने कमी करण्यात आल्याने होऊ शकली. ओलमर्ट यांच्या सुटकेचे वृत्तवाहिन्यांनी थेट प्रसारण केले, मध्य इस्रायलमध्ये स्थित मसीयाहू तुरुंगातून ते तुरुंगातून बाहेर पडताना दिसून आले. ओलमर्ट 2006 ते 2009 पर्यंत इस्रायलच्या पंतप्रधानपदी होते. ते आपल्या अंगरक्षकांसह कारने थेट तेल अवीवस्थित घरी पोहोचले. पॅरोलच्या अटींतर्गत ते पुढील महिन्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतील, आठवडय़ातून दोनदा पोलीस स्थानकात हजेरी लावतील आणि त्यांना देश सोडण्याची किंवा प्रसारमाध्यमांना मुलाखत देण्याची अनुमती नसेल.

राष्ट्रपती रुवेन रिवलिन यांच्याकडे ओलमर्ट माफीकरता आवाहन करतात. जर त्यांचे आवाहन स्वीकारण्यात आले, तर पॅरोलच्या अटी रद्द होतील. ओलमर्ट यांनी 27 महिन्यांच्या आपल्या शिक्षेपैकी 16 महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यांना इस्रायलच्या प्रिजन सर्व्हिस पॅरोल परिषदेच्या गुरुवारच्या निर्णयानंतर सोडण्यात आले. तुरुंगात जाणारे ओलमर्ट हे इस्रायलचे पहिले माजी पंतप्रधान ठरले.