|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिका शाळा नं. 15 बनली हॅपी स्कूल

पालिका शाळा नं. 15 बनली हॅपी स्कूल 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील कुमठे बिटामध्ये ज्या प्रमाणे ज्ञानरचनावाद केला आहे. तो ज्ञानरचनावाद देशभर गाजत असून त्याच धर्तीवर सातारा पालिकेच्या शाळांमध्ये उपक्रम राबवण्याची संकल्पना प्रशासन अधिकारी रमेश गंबरे यांनी सुरु केली आहे. गितांजली शाळेत हा उपक्रम सातारकरांच्या सहकार्याने राबवला जात आहे. या उपक्रमाची पाहणी नुकतीच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी करुन त्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.                                                                                                                                                                

मुलांना शाळेत आल्यानंतर त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी हाच उद्देश ठेवून ज्ञानरचनावादाची संकल्पा पुढे आली. सातारा तालुक्यातील कुमठे बिटात ही संकल्पना प्रभावीपणे राबवली गेली. आता सातारा  शहरातील पालिकेच्या शाळेत अशीच संकल्पना राबवण्यात येणार असून त्याचाच प्रयोग शाळा नंबर 15 मध्ये सुरु केला. विद्यार्थ्यांसाठी खेळणी, शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे. इनरव्हील क्लबच्या सहकार्यातून शाळेमध्ये हॅपी स्कूल हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. या उपक्रमामुळे चांगलाच शाळेच्या परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये फरक पडला. शाळेच्या भिंती रंगवल्या गेल्या आहेत. शाळेत खेळाचे साहित्य देण्यात आले आहे. यासह दानशुर लोकांकडूनही शाळेला मदतही घेण्यात आले आहे. या शाळेतील शिक्षकवर्ग हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच शाळेला भेट देवून शाळेची पाहणी केली. त्यांनी शाळेचे कौतुक केले.