|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » पुण्यातील म्हसोबा मंदिरातून देवाचे डोळे चोरले

पुण्यातील म्हसोबा मंदिरातून देवाचे डोळे चोरले 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात मंदिरातून देवाच्या मूर्तीचे चांदीचे डोळे चोरीला गेले आहेत. दत्तवाडीतील अखिल दत्तवाडी म्हसोबा मंदिरात हा प्रकार घडला आहे.

देवदर्शनाच्या बहण्याने चेर मंदिरात शिरला. मंदिरातील पुजारी बाहेर बसले होते. यावेळी चोराने आजूबाजूला पाहून देवाच्या मूर्तीचे डोळेच काढले आणि पसार झाला. चोरीचे दृश्य मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत होणार आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासही सुरू केला आहे.