|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » सरकारकडून लोकशाहीचा खून : अजित पवार

सरकारकडून लोकशाहीचा खून : अजित पवार 

ऑनलाईन टीम / सांगली :

सरकारने हेकेखोर वृत्ती सोडावी, अशा निर्णयाने विकास अडचणीत येईल. त्यामुळे निर्णयाबाबत फेरविचार करण्याची विनंती करु, हे सरकार लोकशाहीचा खून करण्याचे काम करत आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली.

गावचा सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. यावर बोलताना पवार म्हणाले, जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय चुकीचा आणि लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची विनंती करु, उद्या हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेतून निवडतील, अशाप्रकारची हेकेखोर वृत्ती सरकारने सोडावी, असेही पवार म्हणाले.