|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर परिसरात दमदार पावसाने दिलासा

शहर परिसरात दमदार पावसाने दिलासा 

प्रतिनिधी / बेळगाव

आषाढीच्या पूर्वसंध्येला पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांना  दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र व गोव्यामध्ये दमदार पाऊस पडत असताना बेळगावकडे मात्र पावसाने पाठ फिरविली होती. मात्र सोमवारी दिवसभर काही दमदार सरी कोसळल्याने थोडासा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. तर पहिल्यांदाच सखल भागांमध्ये पाणी तुंबून होते.

सलग तीन वर्षे पाऊस कमी झाल्यामुळे विहिरी, नाले, जलाशये, तलाव यांनी तळ गाठला आहे. गेल्या आठ दिवसांत पाऊस झाला तरी नाले व तलावांमधून पाणीसाठा झाला नाही. सोमवारी मात्र सायंकाळच्या सुमारास 4 ते 5 या वेळेत जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे गटारी भरुन वाहत होत्या. 

जोरदार सरी येताच साऱयांना आसरा शोधावा लागला. या पावसामुळे बाजारपेठेतील सखल भागामध्ये पाणीच पाणी झाले होते. शेतकऱयांबरोबर सर्वसामान्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. सध्या अजूनही दमदार पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे सलग दोन ते तीन दिवस असाच दमदार पाऊस व्हावा, अशीच इच्छा सारेजण व्यक्त करत आहेत.